Video- बलात्काराच्या आरोपीला लोकांकडून चोप

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशच्या राजवाडा बलात्कार प्रकरणातील आरोपीला लोकांना चांगलाच चोप दिला आहे. आरोपीला जिल्हा कोर्टात आणलं तेंव्हा तेथे उपस्थित लोकांसह काही वकिलांनीही त्याला बेदम मारहाण केली. देशभरातील वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे लोकांमुळे संतापाची लाट आहे. यामुळेच लोकांचा आपला राग अनावर झाला आणि त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

आरोपीने आपल्या नात्यातील एका चार महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यानंतर तिची क्रूरपणे हत्याही केली होती. शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला होता.