आधीच पाणीटंचाई त्यात वीजही गायब ;संतप्त निफाडकरांचा हंडा मोर्चा

173

सामना ऑनलाईन | निफाड

उन्हाच्या तीव्र झळांनी उभा महाराष्ट्र होरपळत असताना निफाड तालुक्यात विजेचाही खेळखंडोबा सुरू आहे. त्यात कहर म्हणजे तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असतानाच पालखेडच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडून दिले आहे. त्यामुळे पाणी पाणी करणाऱया संतप्त निफाडकरांनी आज पिण्याचे पाणी आणि विजेची मागणी करत तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेला.

निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात महिलांसह नागरिकांनी रिकाम्या हंडय़ांसह गर्दी केली होती. निफाड बाजार समिती ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात निफाड पंचायत समिती सभापती सोमनाथ पानगव्हाणे, वनसगांवचे सरपंच उन्मेष डुंबरे, द्राक्ष संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटुकाका पानगव्हाणे, शिवडीचे सरपंच गणपतराव क्षीरसागर, दत्तात्रय सुडके, उगांवचे उपसरपंच संदीप पानगव्हाणे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. हक्काचे पिण्याचे पाणी व वीज मिळालीच पाहिजे. कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत महिला हंडा मोर्चा निफाड तहसील कार्यालयावर धडकला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. हक्काचे पिण्याचे पाणी व अखंडित वीज मिळावी यासाठी सदरचा हंडा मोर्चा दाखल केला असून यावर शासनाने दखल घ्यावी, असे उगांव सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय सुडके यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे निफाड पंचायत समिति सभापती सोमनाथ पानगव्हाणे यांनी उगांवसह परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालि असून पालखेड डाव्या कालव्यातून विशेष आरक्षणाद्वारे पाणी साठवण बंधारे भरून देण्यात यावे, पालखेड डावा कालवा उशाला आहे पण पाण्याचा थेंबही आरक्षण करून मिळत नाही. पालखेडच्या आवर्तनातून छोटेमोठे बंधारे भरून देण्याची मागणी केली. यावेळी निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

या मोर्चात द्राक्ष संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटुकाका पानगव्हाणे, वनसगांवचे सरपंच उन्मेष डुंबरे, शिवडीचे सरपंच गणपतराव क्षिरसागर, नांदुर्डीचे सरपंच जितेंद्र निकम, सोनेवाडीचे सरपंच हेमंत सानप, उपसरपंच ज्ञानेश्वर सानप, शरद निरभवणे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाबळे, अब्दुल शेख, रामदास साबळे कल्याण ढोमसे, राजेंद्र आहेर, शिवा ढोमसे, जयवंत मापारी, सुलतान पठाण, रितेश बिरार, बाळासाहेब चव्हाण, लक्ष्मण पानगव्हाणे, साहेबराव कातकाडे दत्तू निकम, महेश खापरे, भगीरथ शिंदे, राजेंद्र बोरगुडे, दिलीप शिंदे, नवनाथ मापारी, लक्ष्मीबाई निरभवणे, योगेश जेऊघाले, शालिनि कडाळे, कमलाबाई घोडे, शैनाज तांबोळी, सुभाष जाधव, लिलाबाई गांगुर्डे, चंद्रकला वाघ, शोभा निरभवणे, योगेश जाधव, प्रमोद क्षिरसागर, राजू तांबोळी, संजय शिंदे, अर्जुन गांगुर्डे, लक्ष्मणराव निकम, रमेश गवळी, रामनाथ सांगळे, कैलास सांगळे, अब्बास तांबोळी, विलास पानगव्हाणे, भागवत निरभवणे, किशोर खापरे, दत्तू शिंदे, सुभाष जाधव, मंगेश शिंदे, शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य किरण शिंदे, संतोष शिंदे, बाळासाहेब शिंदे, दत्ता शिंदे, दीपक घाडगे, वनिता घाडगे, आप्पा बर्केले, शांताराम ठाकरे, समाधान काळे, वनिता खापरे, शांताबाई घायाळ, पुंजाबाई कोल्हे, उषाबाई कापडी, चंद्रकला सस्कर, सुरेखा वाघ, विजय वाबळे, जाकिर शेख, जनाबाई निरभवणे, लक्ष्मी नेहरे आदींसह असंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते. निफाडचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

विकतचे पाणी जनावरांना नाही

निफाड तालुक्यातील उगांवसह शिवडी, खेडे, वनसगांव, थेटाळे, सोनेवाडी, नांदुर्डी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावाला पिण्याचे पाणी मिळेना त्यातच पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने कालव्याकाठच्या गावांचा वीजपुरवठा बावीस तास खंडित ठेवला जात आहे. त्यामुळे टँकरने विकत घेतलेले पाणी नागरिकांना जनावरांना देता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पाच तास अखंडित विजपुरवठा देण्यात यावा व गावांतील पाणी साठवण बंधारे भरून देण्यात यावे या मागणीसाठी निफाड तहसील कार्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या