मंगळावर जाणाऱयांची नावे चिपवर

13

सामना ऑनलाइन , वॉशिंग्टन

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ 2020 साली मंगळ मोहीम करणार आहे. याअंतर्गत  मंगळावर रोबोट पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेचा भाग होऊ इच्छिणाऱया लोकांकडून नासाने ऑनलाइन अर्ज मागवले होते. ही नावे चिपमधून मंगळावर पाठवली जाणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे. ही मोहीम जुलै 2020 मध्ये लाँच झाल्यावर फेब्रुवारी 2021 पर्यंत रोबोटसह अंतराळात पोचणार आहे. नासाच्या मंगळ मोहिमेतून अप्रत्यक्षरित्या जगभरातून लाखो नागरिक मंगळावर पोचणार आहेत. त्यासाठी 20 मे रोजी लोकांकडून नावे मागवली होती. अवघ्या काही तासांत हजारो लोकांचे अर्ज आले होते. ऑनलाइनरित्या सहभागी झालेल्या प्रत्येकाला स्मृतिचिन्ह म्हणून बोर्डिंग पास देण्यात आला. नासाचा हा बोर्डिंग पास म्हणजे स्वप्न असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. प्रत्यक्ष व्यक्ती मंगळावर जाणार नसून त्यांची फक्त नावे मंगळावर जाणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या