मिरचीचे लोणचे

  •  साहित्य:  १/२ किलो हिरवी मिरची, १ वाटी मोहरीची डाळ, पाव चमचा मेथीची (कच्ची) पूड, ३/४ चमचा हळद, १ चमचा हिंग, दीड ते दोन वाटया मीठ, ६ लिंबाचा (रस), १/२ वाटी तेल.
  •  कृती:  सर्वप्रथम मिरच्या धुवून फडक्यावर कोरडय़ा होऊ द्याव्यात. नंतर त्याचे आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करावेत. एका ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद, हिंग व लिंबूरस घालून हलवावे. मोहरी डाळ, मेथीदाणे किंचीतशा तेलावर तांबूस भाजून घेऊन त्याची बारीक पूड करावी. ती मिरचीमध्ये मिसळावी. त्यानंतर मिरचीनुसार भरपूर तेलात मोहरी, थोडा हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यावर ती मिरच्यांवर घालावी. सर्व लोणचे व्यवस्थित कालवावे. काचेच्या बरणीत लोणचे भरून ठेवावे. ही बरणी उन्हात ठेवल्यास लोणचे अधिकाधिक मुरत जाते. साधारण आठ दिवसांनी हे लोणचे बऱयापैकी मुरते. दहीपोहे, दहीभात, उपमा, पराठे, भजी, पुलाव अशा पदार्थांची लज्जत हिरव्या मिरचीच्या लोणच्यामुळे वाढते.