तरुणीवर बलात्कार करून तिच्याच घरी केली आत्महत्या

सामना ऑनलाईन । इरविन

एका व्यक्तीने २० वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करून तिच्याच घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना स्कॉटलँडमधील आयरशीरी शहरातील आहे. आरोपीने तरुणीवर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. तरुणीने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका केली आणि पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पिडित तरुणीला इस्पितळात दाखल केले. पण अरोपीने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आत्महत्या केली होती.

आरोपीचे नाव पिरी असून तो बी क्लास प्रकारचे ड्रग्स विकत असे. तसेच हिंसेसाठी वापरली जाणारे हत्यारेही तो विकण्याचे काम करत होता. पण त्याच्या नावे नोंद असलेल्या गुन्ह्यांत बलात्काराच्या कुठल्याही गुन्ह्याचा समावेश नव्हता. एक व्यक्ती एका तरुणीच्या घरात जबरदस्ती घुसला आहे, त्याने तरुणीवर बलात्कार केला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस जेव्हा तरुणीच्या घरी पोहोचले तेव्हा तरुणी जखमी अवस्थेत होती, तर आरोपी मृत अवस्थेत आढळला.

आरोपी पिरी हा विवाहित असून त्याला दोन मुले होती, पण तो एकटाच राहत होता. पिडित तरुणीला तो आधीपासून ओळखत होता. तरुणीवर आरोपीने हल्ला केल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली होती.