दारुच्या नशेत पत्नीला पेटवले, आई आणि मुलाला ठेचून मारले

सामना ऑनलाइन । सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या कोरफळेमध्ये राहणाऱ्या अनुराथ बरडेने दारुच्या नशेत आई सखुबाई बरडे आणि मुलगा सुदर्शन बरडे यांना दगडाने ठेचून मारले. नंतर त्याने पत्नी रेश्मा बरडेला जीवंत जाळले. नंतर अनुराथला स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या करायची होती, त्यासाठी त्याने मुलीवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजाऱ्यांनी मुलीला वाचवले आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती नाजूक आहे, तिला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अनुराथला अटक केली आहे.