धक्कादायक! दोन मुलं, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

1
suicide

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

फुलंब्री तालुक्यातील साताळ पिंप्री दोन मुली व पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे. दरम्यान, आत्महत्ये मागचे कारण अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

कृष्णा तात्याराव देवरे याने सुकन्या कृष्णा देवरे, हिंदवी कृष्णा देवरे (५), सर्वदा देवरे (६) या तिघांचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने गळफास घेतला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घरगुती कारणावरून हत्या आणि आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक अर्चना पाटील यांनी वर्तवला आहे.