अभिनेत्रीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

47
molestation-1

सामना प्रतिनिधी, मुंबई

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. विश्वनाथम अप्पना पुपाला असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार या अभिनेत्री आहेत. मार्च महिन्यात त्यांना एक फोन आला होता. चित्रपटाच्या कामाकरिता भेटायचे असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. 23 मार्चला अभिनेत्री या चित्रपट पाहण्याकरिता गेल्या असता एक फोन आला. त्यांनी तो फोन उचलला नाही. चित्रपट पाहत असून मेसेज करण्यास सांगितले. रात्री त्यांना एक मेसेज आला. जुहू येथील एका हॉटेलमध्ये यावे असा मेसेज केला. हा मेसेज अभिनेत्रीला समजला नाही. त्यानंतर व्यक्तीने फोन केला. फोनवरील त्या संभाषणामुळे अभिनेत्रीला धक्काच बसला.

तिने याची माहिती तिच्या नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. लेखी तक्रार अर्जावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांना तपासादरम्यान एक तांत्रिक माहिती मिळाली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी विश्वनाथमला तेलंगणा येथून अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या