पेट्रोल-डिझेल फक्त दोन रुपयांनी स्वस्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल फक्त दोन रुपयांनी स्वस्त केले आहे. अबकारी करात 2 रुपये कपात केल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले.

16 जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलच्या दराचा आढावा घेण्याच्या नावाखाली रोजच दरवाढ होत आहे. त्यामुळे तीन महिन्यांत पेट्रोल 81 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 62 रुपयांवर गेले. ही दरवाढ रोखावी, अशी मागणी देशभरात होत असताना सरकारने मात्र आज पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर केवळ दोन रुपयांनी कमी केला.