बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयितांची छायाचित्रे जाहीर

सामना प्रतिनिधी । मुंबई

नवी मुंबई परिसरात लहान बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱया दोन संशयितांची छायाचित्रे नवी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. या संशयितांबद्दल माहिती देण्याचे आवाहन नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त तुषार दोशी केले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नवी मुंबई परिसरतील खारघर, सीबीडी बेलापूर, सानपाडा, वाशी, एमपीएमसी व कोपरखैरणे या पोलीस ठाण्याच्या परिसरात लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या संशयितांबद्दल पोलीस आयुक्तांनी माहिती देणाऱयांना रोख दहा हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. संपर्क पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२२-२७५७२२९८ / ०२२२७५७४९२८ किंवा ०२२२७५६१०९९ तसेच पोलीस उपायुक्त (गुन्हे) ०२२-२७५७६२८४ किंवा पोलीस निरीक्षक (गुन्हे) एन.जे. पिंजण यांना ८१०८००१३००.