बीड जिल्ह्यातील खिसेकापूंना पकडले, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

14


सामना प्रतिनिधी । लातूर

येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशाचा खिसा कापून पलायन केलेल्या बीड जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये रोख व पाच हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मध्यवर्ती बसस्थानकात २३ जानेवारी रोजी उमरगा तालूक्यातील एकोंडी येथील आडत व्यापारी संतोष कल्लाप्पा दहिटणे हे लातूरात शेतीमाल विक्री करून २ लाख रुपये घेऊन गावाकडे जात होते. पाथरी अक्कलकोट बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातील २ लाख रुपये पळवण्यात आले होते. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल होता.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांच्यावर सदरील गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल रेजीतवाड, अंगद कोतवाड, राम गवारे, नामदेव पाटील, युसूफ शेख, राजाभाऊ मस्के, नागनाथ जांभळे यांनी या चोरी प्रकरणी चंद्रकांत लक्ष्मण गायकवाड, रामकृष्ण बबन जाधव या दोघांना चर्‍हाटा फाटा बीड येथून ताब्यात घेतले. १ लाख ६० हजार रुपये रोख व मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. व अन्य जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या