पिंपळाचे महत्त्व

भगवद्गीतेत श्रीकृष्णाने ‘वृक्ष म्हणजे मी’ असं म्हटलंच आहे. पिंपळाबाबतही काही रिवाज प्रसिद्ध आहेत. ते फायद्याचेच आहेत.

> रविवार सोडून इतर दिवशी दररोज पिंपळाच्या झाडाखाली हनुमान चालिसा म्हटले तर हनुमानाची कृपा कायम राहाते म्हणतात. यामुळे पितरांचेही आशीर्वाद मिळतात.

> एका तांब्यात पाणी आणि दूध एकत्र करून घ्यायचे. त्यात ४ बत्ताशे, २ लवंगा आणि काही काळे तीळ घालून ते मिश्रण पिंपळाच्या मुळाशी अभिषेकाने घालायचे. अभिषेक करताना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा जप करायचा.

> पिंपळाच्या झाडाखाली दररोज पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

> आजारपणात पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपल्या उजव्या हाताने पिंपळाला स्पर्श करून आजार दूर कर असे मनात बोलल्याने फरक पडतो.

> व्यवसायात वृद्धी हवी असेल तर शनिवारी पिंपळाचे एक पान घेऊन ते चांगल्या पाण्याने धुवून त्यावर मग चंदनाने स्वस्तिक बनवून व्यापारात वृद्धी व्हावी अशी प्रार्थना करा. ते पान आपल्या खोलीतील तिजोरीत ठेवा. असे ७ शनिवार करा.