हिवरेतील शाळकरी मुलाचा वडिलांनीच केला खून; पोलिसांनी 48 तासांत लावला खुनाचा छडा

कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथील 12 कर्षीय शाळकरी मुलाचा खून त्याच्या वडिलांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विजय खताळ असे खून करणाऱया वडिलांचे नाव असून, आपल्याला कर्करोग झाला असावा, अशी भीती त्याला सतावत होती. आपल्या मृत्यूनंतर मुलाचे कसे होईल, त्याचा सांभाळ कोण करील, त्यालाही कर्करोग होईल, या काळजीतून मुलाचा रस्सीने गळा आवळून खून केल्याची कबुली वडिलांनी दिली आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून 48 तासांत आरोपीला जेरबंद केले. आरोपी वडिलांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हिवरे गावच्या हद्दीत कुंभारकी नावाच्या शिवारात 23 डिसेंबर रोजी विक्रम ऊर्फ प्रणव विजय खताळ (कय 12) या शाळकरी मुलाचा अज्ञाताने गळा आवळून खून केल्याचा गुन्हा काठार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक  विश्कास शिंगाडे, पतंग पाटील, अमित पाटील यांचे विशेष पथक तयार करून या गुह्यातील आरोपीस पकडण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर काठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांचेही एक पथक तयार करून त्यांनाही या गुह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. गुन्हा घडल्यापासून पोलीस पथके हिवरे गावात तळ ठोकून होती.

मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून आणि स्थानिकांच्या चौकशीवरून हा गुन्हा वडिलांनी केल्याचा संशय पोलिसांना होता. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीमध्ये तफाकत दिसून येत होती. त्यामुळे पोलिसांनी वडिलांवर लक्ष केंद्रित केले होते.  त्यानुसार वडिलांना विश्कासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. खून करण्याचे कारण विचारता आरोपीने त्याला कर्करोग असल्याचा संशय होता क मृत्यूपश्चात आपल्या मुलाचे कसे होईल, त्याचा कोण सांभाळ करील, त्यालाही कर्करोग होईल, या विवंचनेतून हा खून केल्याचे त्याने कबूल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.