टीप्स – मधुमेह टाळण्यासाठी

टीप्स ः मधुमेह टाळण्यासाठी

मधुमेहींनी आपले शरीर सतत कार्यक्षम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी उठल्यावर नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे असते. व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच नृत्य करणे, खेळणे, भरभर चालणे यामुळे टाइप टू मधुमेहाची शक्यता 30 टक्क्यांनी कमी होते. जेवल्यावर लगेच न झोपता पंधरा मिनिटे चालून मगच झोपायला हवे.

आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे. मधुमेहींनी धूम्रपान, मद्यपान, सिगारेट, तंबाखू या व्यसनांपासून दूरच राहावे. या सवयींमुळे आयुष्य कमी होते.

तणावाचा परिणाम हा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक असतो. तणाव हे मधुमेहाचे सर्वात मोठे कारण आहे. केवळ मधुमेहच नक्हे, तर अनेक आजारांना आमंत्रण असते. त्यामुळे तणावापासून दूर रहा. तणावासाठी मेडिटेशन फायदेशीर आहे.

मधुमेहींसाठी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. नियमित औषधे असल्यामुळे मधुमेही रुग्णांना भूकही लागते. अशा वेळी आरोग्यदायी आहार घेणे गरजेचे असते. मधुमेहींनी किशेषतः तंतुमय पदार्थांनी युक्त अन्न खावे. तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळाकेत.

या रुग्णांनी पुरेशी झोप घेणे त्यांच्या तब्येतीसाठी आवश्यक असते. किमान सात ते आठ तास झोप घेतल्यावर त्यांचा थकवा जाऊन ताजेतवाने वाटेल. झोप व्यवस्थित झाली की, माणसाला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही आणि चिडचिडही होत नाही.