रेल्वेमंत्र्यांची तब्येत बिघडली, ब्रीच कँडीमध्ये दाखल

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची तब्येत बिघडली. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी केली परळ-एलफिन्स्टनच्या पुलाची पाहणी

सिग्नलने ‘मरे’चे वाजवले बारा

रेल्वेच्या हद्दीत सुरू असलेल्या निवडक कामांची पाहणी केल्यानंतर रेल्वेमंत्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दालनात बसले होते. तिथेच अॅसिडिटी आणि जुलाब यामुळे त्यांची तब्येत बिघडली. रेल्वेमंत्र्यांना सरकारी गाडीतून तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पत्रकार परिषद रद्द

रेल्वेमंत्री आज (सोमवारी) संध्याकाळी ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक पत्रकार परिषद घेणार होते. मात्र रेल्वेमंत्र्यांची तब्येत बिघडल्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.