तुरुंगाधिकाऱ्यांच्या पोटात काच खुपसण्याचा डाव उधळला

सामना प्रतिनिधी । ठाणे
कारागृहात इतर कैद्यांची छळवणूक केल्याप्रकरणी जाब विचारला असता संतप्त कैद्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांच्या पोटात खिडकीची काच फोडून खुपसण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी वेळीच भोंगा वाजकून धोक्याचा इशारा दिल्याने वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बराक क्रमांक तीनमध्ये न्यायबंदी आशीष नायर क छोटेलाल दुलारे सहानी हे कैदी शिक्षा भोगत आहेत. 18 ऑगस्ट रोजी दिंडोशी न्यायालयात हे दोघे सुनावणीसाठी गेले असता नायरने सहानी याला नशेच्या कॅप्सूल गिळायला लाकल्या होत्या. कारागृहात परतल्याकर सहानीच्या पोटातील ‘त्या’ कॅप्सूल बाहेर काढण्यासाठी नायर त्याला सतत मिठाचे आणि तंबाखूचे पाणी पाजून उलटी करण्यास सांगत होता, मात्र उलटी करूनही ‘त्या’ कॅप्सूल बाहेर न पडल्याने सहानीची प्रकृती ढासळली. याप्रकरणी सहानी याने कारागृहातील कॉर्डन इरफान पठाण यांच्यासह कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी तुरुंग अधिकारी सतीश माने, वरिष्ठ तुरुंग अधिकारी कानसकर, शिंदे यांनी नायर याला कारागृहातील कार्यालयात बोलावले. यावेळी संतप्त नायर याने या अधिकाऱ्यांकर हल्ला केला.