धावपट्टीवरून विमान घसरले; नेपाळमध्ये 21 प्रवासी सुखरूप

सामना ऑनलाईन । काठमांडू

येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकत्याच दुरुस्त केलेल्या धावपट्टीवर नेपाळचे प्रवासी विमान घसरून गवतात अडकून पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेतून विमानातील सर्व 21 जण बचावले आहेत. विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे काठमांडू शहरातील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 12 तास बंद होते. त्यामुळे हजारो प्रवाशांवर विमानतळावर थांबण्याची वेळ आली.