ही झाडं घरात ठेवा

तुळस

तुळशीचा आयुर्वेदामध्ये मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने तुळस वनस्पतींमध्ये अग्रगण्य मानली जाते. तुळशीचे रोप दिवसरात्र ऑक्सिजन देते. हे रोप प्रदूषण नियंत्रणात आणतं. हवेतील बॅक्टेरिया मारून नकारात्मक ऊर्जा नाहीशी करतं. सर्दी, ताप, खोकल्यासाठी याचा काढा एकदम गुणकारी आहे. तुळशीच्या पानांचा रस त्वचेचे आजार, तोंडाची दुर्गंधी दूर करतात.

लव्हेंडर

लव्हेंडर घरातील हवा शुद्ध करते. कीटकांपासून बचाव होतो. तसेच घरात डास येत नाहीत. लव्हेंडर फुलांचा रस त्वचेच्या आजारांसाठी रामबाण उपाय आहे. या फुलाच्या सुगंधाने डोकेदुखी आणि मायग्रेनच्या त्रासापासून मुक्तता मिळेल.

डाळिंब

डाळिंबाचे झाड प्रदूषण कमी करते. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई आहे. तसेच फॉलिक ऑसिडबरोबर ऍण्टी बॅक्टेरिअलला मारून टाकतो. डाळिंबाचा रस ऍण्टी ऑक्सिडेण्ट्स गुणांनी परिपूर्ण आहे. याच्या सेवनाने रक्त वाढते.  वजन आटोक्यात राहते.

कोरफड

कोरफडीमुळे हवा शुद्ध राहते. कापल्यावर, जळल्यावर कोरफडीचा गर लावायचा. पण याबरोबर केसांना आणि त्वचेला कोरफडीचे जेल लावल्यास त्याचा खूप फायदा होतो. कोरफडीचा ज्युस पोटासाठी उत्तम औषध आहे.

कढीपत्ता

कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढवण्यासाठी करतात. पण याबरोबरच कढीपत्त्याची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रक्तशुद्धीसाठीही गुणकारी आहे. कढीपत्त्याच्या सेवनाने अपचनाचा त्रास होत नाही. वजन कमी होते आणि मधुमेह आटोक्यात राहतो. जळल्यावर किंवा जखम झाल्यावर कढीपत्ता उत्तम औषध आहे.