सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी 22 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान

mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी, मुंबई

सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमकप्रकरणी मुंबईतील सीबीआय कोर्टाने सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह डी. जी. वंझारा, एम. एन. दिनेश आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र यातील 22 जणांची मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष सुटका करण्यात आली.