अभिनंदन करतो मित्रा! पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरे यांचं कौतुक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँडमध्ये स्वच्छाता मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे या स्वच्छता मोहिमेकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. मुंबईकरांनी आदित्य ठाकरे यांच्या मुंबई स्वच्छता सेवेला दाद दिली. पण विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमधून आदित्य ठाकरे यांच्या सफाई कामाचं कौतुक केलं.

I congratulate my young friend @AUThackeray for participating in a cleanliness initiative in Mumbai & adding momentum to #SwachhataHiSeva.

— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2017

‘मी तुझं अभिनंदन करतो माझ्या तरुण मित्रा!’, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटवर देशभरातील तरुणांनी, नेटकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी देखील पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच ‘देश सेवा करणे हा सन्मानच समजतो. देशहितकारक कार्यासाठी उद्धवजी, मी आणि आम्ही सगळेच तुमच्या नेहमी सोबत असू’, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.