31ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे लोकार्पण

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

31ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण होईल, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली. दिल्लीत भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी बैठकीचा शेवटच दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या कार्यकारिणीत आपण ही घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.

रुपाणी म्हणाले की, “जर पटेल नसते तर हिंदुस्थानचे चित्र वेगळे असते. 2013 साली नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा बनवण्याची घोषणा केली होती. 31ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होईल. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे स्मारक स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट मोठे असेल”. हे स्मारक एकतेचे प्रतीक असून याच्या माध्यामातून पंतप्रधान मोदींकडून पटेलांना श्रद्धांजली वाहिल्याचे त्यांनी सांगितले.