मोदींनी ट्विटरवरून हटवलं ‘चौकीदार’!

43
modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाल्यावर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘चौकीदार’ शब्द हटवला आहे. ‘आता चौकीदाराची ही प्रेरणा पुढल्या टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे,’ असे ट्विट मोदींनी केले.

‘चौकीदाराची ही प्रेरणा जिवंत ठेकून पुढच्या वाटचालीत हा शब्द लक्षात ठेवा आणि हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी काम करत रहा. हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी काम सुरू ठेवा. ‘चौकीदार’ हे नाव माझ्या ट्विटरवरून जाईल, पण ते माझं अभिन्न अंग असेल. तुम्हालाही असं करण्याची मी विनंती करतो,’ असे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे.

यंदाची लेकसभा निवडणूक प्रचाराच्या फंड्यावरून चांगलीच गाजली. त्यातही ‘चौकीदार’ या शब्दाने प्रचार ढकळून काढला. ‘मी देशाचा चौकीदार’ अशी घोषणा मोदींनी केली. मोदींवर विरोधी पक्षांनी कथित राफेल घोटाळय़ानंतर ‘चौकीदार चोर हैं’ म्हणत टीका केली होता. त्यानंतर मोदींनी याच शब्दाची ढाल केली होती. आधी मोदींनी आणि त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नावापुढे ‘चौकीदार’ हा शब्द जोडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या