बहनो, भाईयो… दिल्लीत मोदींच्या भाषणात नवे काहीच नाही

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि विरोधकांवर टीका केली. आज रामलीला मैदानावर त्यांनी ‘राफेल’ प्रकरणासह जनधन, जीएसटी, स्वच्छ भारत, वीज, घरकुल आदी योजनांचा पाढा वाचला. ‘मन की बात’ आणि विविध प्रचारसभांमध्ये मांडलेल्या त्याच त्या मुद्दय़ांची उजळणी मोदी यांनी केली.

मोदी काय म्हणाले
– देशाला मजबूत सरकार हवे पण विरोधकांना ‘मजबूर’ सरकार हवे.
– मेक इन इंडिया, जीएसटी, स्वच्छ भारत अभियान या योजनांना काँग्रेसने विरोध केला.
– ज्या पक्षांचा जन्म काँग्रेसला विरोध करण्यासाठी झाला तेच पक्ष आज काँग्रेससोबत महाआघाडी करत आहेत.
– 2022 पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे.

तीन राज्यांत हरलो; नाउमेद होऊ नका!
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. ‘तीन राज्यांतील पराभवाने भाजप कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये. विरोधक जिंकले असले तरी भाजप पराभूत झालेला नाही, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या