मोदी सुंदर नाहीत म्हणून त्यांच्या बायकोने त्यांना सोडले, मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

1

सामना ऑनलाईन । बंगळुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा हा सुंदर नसल्यामुळेच त्यांची बायको त्यांना सोडून गेली असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मंत्री बी.झेड. झमीर अहमद खान यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसातून दहा वेळा तोंड धुतात, मेकअप करतात व नंतरच कॅमेरासमोर येतात. त्यामुळे त्यांचा चेहरा प्रसारमाध्यमांना आवडतो अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना भाजप नेते कागे यांनी कुमारस्वामी यांनी शंभर वेळा आंघोळ केली तरी ते काळ्या म्हशीसारखेच दिसणार, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

कागे यांच्या वक्तव्यानंतर आता बी.झेड. झमीर अहमद खान यांनी मोदींच्या खासगी आयुष्यावर टीका केली आहे. ‘भाजपचे खासदार शिवाकुमार उदासी लोकांना सांगतात की माझ्या व मोदींच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करा. ते त्यांनी केलेल्या कामाबद्दल सांगत नाही. मोदी यांना एक पत्नी होती व त्या पत्नीने मोदींचा चेहरा सुंदर नाही म्हणून त्यांना सोडले. मग आता लोकांनी मोदींचा चेहरा पाहून का मतदान करायचे’, अशी टीका बी.झेड. झमीर अहमद खान यांनी केली आहे.