…आणि पंतप्रधान मोदी आडवाणींच्या निवासस्थानी पोहोचले

1
modi-advani

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी उप पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज 91 वा जन्मदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आडवाणी यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.