PM Modi पंतप्रधान मोदींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

11


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सध्या बायोपिकला सुकाळ आला आहे. एकामागोमाग एक बायोपिक प्रदर्शित होत असून बॉक्स ऑफिसवर चांगला गल्लाही जमवत आहेत. शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आधारित ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटही प्रदर्शित झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला होता.

‘पीएम नरेद्र मोदी’ या चित्रपटामध्ये अभिनेता विविके ओबेरॉय प्रमुख भूमिकेत दिसणार असून तो पंतप्रधान मोदींची भूमिका साकारत आहे. परंतु या चित्रपटात मोदींची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा मात्र करण्यात आला नव्हता. आता प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट ही पंतप्रधान मोदींची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका साकारणार आहे. या दोघांव्यतिरिक्त चित्रपट बोमन इराणी, जरीना वहाब आणि मनोज जोशी यासारखे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका मिळाल्यानंतर बोलताना बरखा म्हणाली की, टीव्ही मालिका ‘गोलियों की रासलीला…’ यामधील माझी भूमिका आवडल्याने त्यांनी माझी निवड केली. तसेच पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याने खूश असल्याचे बरखा म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या