#MumbaiBridgeCollapse पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

4

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पादचारी पूलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 36 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी ट्विट करून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

‘मुंबईत पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल ऐकून फार दुख झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुखात मी सहभागी आहे. तर जखमींच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. महाराष्ट्र सरकार या दुर्घटनेतील जखमींना सर्व प्रकारची मदत करत आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी देखील या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. ‘रेल्वेचे डॉक्टर्स व अधिकारी कर्मचारी सर्वच जण या दुर्घटनेत मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना बचाव कार्यात मदत करत आहेत’, असे ट्विट गोयल यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या