Modi ‘जे भ्रष्ट त्यांनाच मोदींमुळे कष्ट’, विरोधकांवर पंतप्रधानांचा हल्लाबोल

12


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हरयाणा दौऱ्यात आहे. कुरुक्षेत्रात पंतप्रधान मोदींनी विरोधक व महाआघाडीवर जोरदार हल्ला चढवला. जे लोक भ्रष्ट आहेत त्यांनाच मोदींमुळे कष्ट होत आहेत, असा टोला पंतप्रधानांनी लगावला. तसेच यावेळी मोदींना महाआघाडीचा उल्लेख पुन्हा एकदा महाभेसळ असा केला.

महाभेसळीत दिसणारे सर्व लोक तपास यंत्रणा आणि न्यायालयाला धमकी देण्यात गुंतले आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी आतापर्यंत सत्ताकाळात केलेल्या कामाचा उल्लेख केला. तसेच युरोपमध्ये एक अशी जागा आहे की जेथे पर्यंटक घराबाहेर रंगवलेल्या भिंती पाहण्यासाठी जातात, परंतु एक दिवस असा येईल की हिंदुस्थानातील एका गावात शौचालयांवर रेखाटलेले चित्र इतके सुंदर असतील की ते पाहण्यासाठी जगभरातून लोक येतील, असे ही मोदी यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या