सरकार रोखणार सिनेमांची पायरसी

207

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानी सिनेमांची ख्याती जगभरात असून परदेशात गेल्यानंतर विविध देशांच्या नेत्यांशी आपला संवाद होतो तेव्हा त्यांच्याकडूनही हिंदुस्थानी सिनेमांचे कौतुक ऐकायला मिळते असे प्रशंसोद्गार काढतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिनेमांची पायरसी रोखण्यासाठी सरकार प्रभावी पावले उचलेल, असे आश्वासन सिनेसृष्टीला दिले.

मुंबई दौऱयावर आलेले पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’चे शनिवारी उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. हिंदुस्थानी अर्थव्यवस्था आणि संस्कृतीमध्ये सिनेमांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे असे सांगतानाच सिनेमांच्या शूटिंगला परवानगी आणि अन्य संबंधित बाबींसाठी एक खिडकी सिस्टम आणण्याचा सरकारचा विचार आहे, असे मोदी यांनी सांगितले. दावोसमधील जागतिक आर्थिक संमेलनाच्या धर्तीवर हिंदुस्थानात जागतिक चित्रपट संमेलन भरवले गेले पाहिजे असेही ते म्हणाले.

सिनेमामुळे ‘चायवाला’ही पैसा कमावतो
पर्यटनाला चालना देण्यात सिनेमाची महत्त्वाची भूमिका आहे. पर्यटनाला चालना मिळाली की गरीबांनाही रोजगार मिळतात आणि अगदी साधा ‘चहावाला’ही पैसा कमावतो असे मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या