लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू अहवाल उघड करण्याचा निर्णय पंतप्रधान, गृहमंत्रीच घेतील !

37

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचा शवविच्छेदन अहवाल काढण्यात आला होता का ? याबाबतची माहिती उघड करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंगच घेतील. या संदर्भातील सर्व कागदपत्रे पंतप्रधान आणि गृहमंत्राच्या निदर्शनास आणा असे निर्देश केंद्रीय माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांना दिले आहेत.

केंद्रीय माहिती आयुक्त ( सीआयसी ) कार्यालयाकडे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यू अहवालाचे गूढ उघड करा असे अनेक अर्ज नागरिकांनी माहिती अधिकार कायद्यान्वये केले आहेत. या अर्जांचा निपटारा करण्यासाठी सीआयसींनी वरील निर्देश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या