अंबरनाथमध्ये जागतिक मराठी दिनानिमित्त पार्कातल्या कवितांचे आयोजन

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

अंबरनाथ मध्ये कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद अंबरनाथ व अंबर भरारी यांच्या सयुक्त विद्यमाने अंबरनाथ मध्ये पार्कातल्या कवितांचे आयोजन करण्यात आले आहे. हा अंबरनाथ मधील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक पार्कमध्ये येत्या २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमात सुरज उतेकर, ऋता खापर्ड, विशाखा विश्वनाथ, जितेंद्र लाड, जितेंद्र पेंढारकर, प्रथमेश पाठक, अनवर मिर्झा, पुर्वा, विशाल राजगुरु, ममता सिंधुताई, संकेत जाधव, मनोज फालके, पुष्कर मैड, स्वाती पाटील, नारायण टिकम, दिलीप मालवणकर दिपाली कात्रे हे कवी आणि कवयित्री सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला अभिनेत्री विशाखा सुभेदार व दिग्दर्शक महेंद्र पाटील, किरण येले, शशिकांत तिरोडकर याची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी या कार्यक्रमाचे आयोजक असून अंबरनाथमधील जास्तीत जास्त कवींनी या मैफिलीत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.