अखेर मौत का कुँआ बंद होणार

सामना प्रतिनिधी, कल्याण

वायूबाधेने गुदमरून पाच जणांचा ज्या विहिरीत बळी गेला ती विहीर आता कायमची बुजवली जाणार आहे. पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी तसे आदेश प्रभागक्षेत्र अधिकाऱ्याला दिले. गुरुवारी चक्कीनाका परिसरातील भीमा शंकर विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा वायूबाधेने गुदमरून मृत्यू झाला. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात दोघा अग्निशमन जवानांही आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान दुर्घटनाग्रस्त विहीर आणि परिसरातील केमिकल कंपन्यांची पाहणी आयुक्त बोडके यांनी केल्यानंतर ही विहीर तातडीने बुजवण्याचे आदेश दिले. दरम्यान, ‘त्या’ विहिरीत पाच जणांचे बळी गेल्याने ऐन दिवाळीत चक्कीनाका परिसरावर शोककळा पसरली आहे.

summary- poisoned well in kalyan will be close soon