पीओकेमधील लोकांचा पाकड्यांच्या वर्चस्वाला नकार

संग्रहीत

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पीओकेमधील ७३टक्के लोकांचा पाकड्यांच्या वर्चस्वाला विरोध असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधील रावळकोट येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘डेली मुजादाला’ या वृत्तपत्राच्या पाहणीतून ही माहिती उघड झाली आहे. विरोधातला आवाज दडपून टाकण्यासाठी पाकिस्तान सरकारने ‘डेली मुजादाला’ या वृत्तपत्राच्या प्रकाशनावर बंदी घातली आहे.

‘डेली मुजादाला’ने मागील पाच वर्षांत पीओकेमध्ये सखोल पाहणी केली. या पाहणीमध्ये पीओकेमधील ७३ टक्के लोकांनी पाकड्यांच्या वर्चस्वाला विरोध केला आहे. पाकडे फक्त स्वार्थ पाहतात. पाकिस्तानचे सैन्य पीओकेमधील नागरिकांवर अत्याचार करत आहे. याउलट हिंदुस्थानमध्ये राहणारे कश्मीरी सुरक्षित आहेत. हिंदुस्थानी राजवटीत कश्मीरचा विकास होत आहे, अशी भावना पीओकेमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

‘डेली मुजादाला’ने केलेल्या पाहणीचा अहवाल पाकिस्तानच्या स्थानिक ‘रिपब्लिकन चॅनल’वर दाखवण्यात आल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. नेहमीप्रमाणे पीओकेमधील नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. चॅनेलने ‘डेली मुजादाला’ वृत्तपत्राचे संपादक हारिस क्वादर यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी आपण केलेल्या पाहणीची माहिती दिली.

हारिस क्वादर यांनी सांगितले की, आम्ही पीओकेमधील नागरिकांना दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा होता की, पीओकेमधील लोक १९४८मधील ‘डेमोग्राफी’ बदलण्यास सहमत आहेत का? याला नागरिकांना सर्वात जास्त होकार दिला. त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की, पीओकेवरील पाकिस्तानी वर्चस्वाला मान्य करता का? याला उत्तर देताना ७३ टक्के लोकांनी पाकिस्तानच्या सरकारला नकार दिला आहे.