बनावट नोटांसह तरुणाला अटक

1

 सामना प्रतिनिधी । मुंबई

दिवाळीनिमित्त बाजारपेठा ग्राहकांनी हाऊसफुल्ल झाल्या आहेत. याचा फायदा उठवत बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामटय़ाला गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने दोन हजाराच्या 13 बनावट नोटांसह पकडले. ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आस्वाद हॉटेलच्या विरुद्ध बाजूला एक तरुण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची खबर युनिट-3 मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निपुंभे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून दबिरूल इरफान शेख (24) या तरुणाला ताब्यात घेतले. तो मूळचा पश्चिम बंगालचा असून मुंबईत खेरवाडी येथील शिवाजीनगर परिसरात राहत होता.