पोलीस वैतागले ‘पद्मावत’वर

4
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘पद्मावत’ हा वादग्रस्त चित्रपटासाठी मुंबईसह अनेक शहरांमध्ये चित्रपटगृहाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. या चित्रपटासाठी अनेक सिनेशौकिनांनी गर्दी केल्याचे चित्र देशभरातील अनेक चित्रपटगृहाबाहेर पाहायला मिळत असले तरीदेखील या चित्रपटामुळे पोलीस मात्र चांगलेच वैतागले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारीला हा चित्रपट सर्व ठिकाणी प्रदर्शित झाला. या प्रदर्शनादरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. चित्रपटगृहात पद्मावत प्रदर्शनादरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी अनेक पोलिसांना वेगळा वेश परिधान करुन चित्रपट पाहण्यासाठी बसविण्यात आले होते. त्यातील काही पोलिसांनी पद्मावत चित्रपट १५ ते २० वेळा बघितला असल्याने पोलिस आता फार कंटाळून गेले आहेत. कंटाळलेल्या पोलिसांनी पद्मावत बाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, पद्मावत या चित्रपटातील सर्व सवांद तोंडपाठ झाले आहेत. त्याशिवाय पद्मावत या चित्रपटावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर त्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी किंवा त्यात भूमिका साकरलेल्या कलाकारांपेक्षा आम्ही जास्त प्रश्नाची उत्तरे देऊ शकू असा दावाही पोलिसांमार्फत केला गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या