बिहारमध्ये बुथ कॅप्चरींगचा प्रयत्न, पोलिसांवर जमावाचा हल्ला

8

सामना ऑनलाईन । पाटणा

निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील बिहार, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला आहे. बिहारमधल्या अर्राह मतदान केंद्रावर जमावाने हल्ला करून बुथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या जमावाला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

दरम्यान,  बुथ कॅप्चरींग करून बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या जमावाला पोलिसांनी हुसकावून लावले आहे. तसेच सध्या या मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू असल्याचे येथील निवडणूक अधीकाऱ्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या