श्रीपाद छिंदमसह 60 जणांना मंगळवारी शहरबंदी

shripad-chhindam

सामना प्रतिनिधी । नगर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 60 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी 50, तर कोतवाली पोलिसांनी 10 जणांवर ही कारवाई केली आहे.

भिंगार कॅम्प पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियमातील 107 मधील तरतुदींनुसार दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.