पंतप्रधान मोदींचा ईमेल आल्यावर लाचखोर पोलीस निलंबित

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुलुंड टोलनाका येथे ट्रकचालकांकडून लाच घेणाऱया वाहतूक शाखेतील पोलिसाला सेवेतून निलंबित करण्यात आले. निवृत्ती पांडुरंग घुगे असे या कॉन्स्टेबलचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ईमेल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निवृत्ती घुगे हा वाहतूक शाखेच्या विक्रोळी विभागात कार्यरत असून तो मुलुंड चेकनाक्यावर ट्रकचालकांकडून पैसे उकळतो अशी तक्रार राहुल म्हात्रे या तरुणाने पंतप्रधान मोदी यांना ईमेलद्वारे केली. या तक्रारींवर गांभीर्याने कारवाई करण्याच्या सूचना मोदींच्या कार्यालयातून पाठविलेल्या ईमेलवरून मुंबई पोलीस आयुक्तांना करण्यात आल्या. तक्रारीत तथ्य आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने दोन दिवस चेकनाक्यावर सापळा रचला. घुगे ट्रकचालकांकडून पैसे घेताना व्हिडीओ शूटिंग करण्यात आले आणि त्याचा अहवाल या पथकाने वरिष्ठ अधिकाऱयांना दिला.

या अहवालात घुगे हे ट्रकचालकांकडून लाच घेत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

  • Zameerahmed Valsangkar

    Muslim samajatil anaykarak prathanvar Shiv Sena akramak!!! wah kya news hai!!!