नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचे छापे

8

सामना प्रतिनिधी, जामखेड

खर्डा येथील वाकी नदिपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या आठ ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नदीपात्रात छापा टाकला. या छाप्यात ट्रॅक्टर जप्त करून वाहनांसह एकूण 43 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण 15 जणांवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले होते. यातील अकरा जणांना अटक करण्यात आली होती तर चार जण फरार झाले होते. या अकरा जणांना आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ते आरोपी पुढील प्रमाणे – तुकाराम सिताराम गोपाळघरे (वय 26, रा.नागोबाची वाडी), गणेश सतीश जगताप (वय 34, रा. वाकी), नितीन कांतीलाल जगताप (वय 34, रा. वाकी), दत्ता शामराव डोके (वय 35, रा. खर्डा), सूरज भागवत भुते (वय 20, रा. खर्डा), सोमेश्वर अशोक सोरटे (वय 28, रा. वाकी), महेश राजू डोके (वय 20, रा खर्डा), रावसाहेब आण्णा सुरवसे (वय 33, रा. खर्डा), विजय जगन्नाथ सावंत (वय 31, रा. वाकी), नंदकुमार जगन्नाथ सावंत (वय 35, रा. वाकी), भिमराव प्रल्हाद गोपाळघरे (वय 40, रा. नागोबाची वाडी, ता. जामखेड) या अकरा आरोपींना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर ट्रॅक्टर मालक भानुदास प्रल्हाद गोपाळघरे (रा.नागोबाचीवाडी), राम विठ्ठल भोसले, नामदेव बाबासाहेब जोर व मदन पांडुरंग गोलेकर (तिघेही रा.खर्डा) हे चार आरोपी फरार झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या