जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणार्‍या विरुद्ध धडक कारवाई , लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

138
sand-mafia
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, नगर

जिल्हयातील अवैध वाळू उपसा व चोरी विरुद्ध धडक कारवाई करुन 19 वाहनासह 1,09,94,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात 11 ठिकाणी कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व चोरी करणार्‍या व्यक्तिंविरुद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम राबवून एकूण 1, 09, 94, 000 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये वाळू, 7 डंपर, 9 ट्रॅक्टर, 3 टेम्पो असे एकूण 19 वाहने जप्त करून एकूण 36 आरोपी विरुध्द 11 ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भारतीय दंड संहिता व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये संबंधीत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

यामध्ये शेवगांव येथे 18 लाख 60 हजार रुपयांचे दोन डंपर व सहा ब्रास वाळुसह बाबासाहेब प्रल्हाद नागरे (वय 30, रा.पिंगेवाडी,ता.शेवगांव,नगर), अंजनाथ नारायण धोंगडे (वय 19, वर्षे, रा.शिंगोरी, ता.शेवगांव), भाऊसाहेब आण्णासाहेब काकडे (रा.तोंडोळी, ता.पाथर्डी,नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्ञानेश्वर माणिक कवडे (वय 30, रा.मुंगी, शेवगांव), मंगेश दत्तात्रय राजेभोसले (वय 30, शेवगांव), गजानन दत्तात्रय राजेभोसले (शेवगांव) यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांच्याकडून 9 लाख 30 हजार रुपये किंमतीचा एक डंबर व तीन ब्रास वाळु ताब्यात घेतली आहे. तसेच शिवाजी सुखदेव बोडखे, बंडू गिताराम विखे यांच्यावर शेवगांव पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

राहुरी येथे 21 लाख 40 हजार रुपयासह टेम्पो व तीन ट्रॅक्टर सह चार ब्रास वाळु हस्तगत करुन राजू भाऊ मधे (वय 22, रा.चिखलठाण,ता.राहुरी), नाना कान्हा काकडे (रा.शेरी, ता.राहुरी), विलसा ज्ञानदेव पारधे (रा.म्हैसगांव,ता.राहुरी), तुळशीराम आंबादास बर्डे (रा.सदर), दिलीप आंबादास वर्डे(वय 30, रा.राहुरी), आंबादास जयंवंत बर्डे (राहुरी), दिलीप संपत शिंदे (वय 31, रा.पारनेर,) रामदास जबाजी काळनगर (वय 31, पारनेर)यांचा समवेश आहे.
सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अजित बाळासाहेब मगर (वय 24, रा.वाघुंडे,ता.पारनेर), बाळू अबाजी मगर (वय 45, रा.पारनेर) यांच्याकडून 4 लाख 10 हजार रुपये व ट्रॅक्टर सह एक ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यात अज्ञात चालक व मालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून येथून 4 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

राहता पोलिस स्टेशनमध्ये 10 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन यामध्ये दोन ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळु आहे. यामध्येछबू यडू बसे, योगेश सुखदेव साळुंखे, इंदर नंदुरव ठोंबरे, दत्तू ठोंबरे, मिथून नानासाहेब ठोंबरे, गंगाधर ठोंबरे, अनिल पोपट तुवर, लाला तुरकने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पारनेर येथे 10 लाख 30 हजार रुपये व दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली आणि तीन ब्रास वाळू असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. येथे मनोहर जाकू मधे व बाळू पुंड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत येथे 12 लाख 30 हजार रुपयांची दोन ट्रॅक्टर व ट्रॅलीसह दोन ब्रास वाळु हस्तगत केली असून गणेश नवनाथ कानगुडे, संदीप पुलचंद कायगुडे, गणेश ठोंबरे, आबा ठोंरबे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर नगर शहरात अनिल धोंडीराम सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून 10 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्रीरामपूर येथे 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन अल्ताप कलीम सय्यद याला ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलिस अधिक्षक सागर पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर पडतरे, मोहन गाजरे, बाळासाहेब मूळीक, दत्ता हिंगडे, रविंद्र कर्डीले, विजय वेठेकर, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, मन्सूर सय्यद, बबन मखरे, संतोश लोंढे, सचिन अडबल, राम माळी, रोहिदास मिसाळ, कमलेश पाथरुट, रणजित जाधव, राहूल सोळूंके, विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, जालिंदर माने, रोहीदास नवगीरे, विनोद मासाळकर, संभाजी कोतकर, सचिन कोळेकर, बाळासोब भोपळे यांच्या पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या