केरळसाठी का नाकारली हिंदुस्थानने परकीय मदत? काय आहे धोरण?

सामना ऑनलाईन । मुंबई

युएई ने केरळसाठी ७०० कोटींची मदत दिली की नाही, यावर चांगलेच वादंग उठले आहे. पण हिंदुस्थानने केरळमधील नैसर्गिक आपत्तीत कुठलीच परकीय आर्थिक मदत स्वीकारली नाही, त्याचे कारण २००४ साली केंद्र सरकारने स्वीकारलेले धोरण. हिंदुस्थानची प्रतिमा ही मदत स्वीकारणारी नव्हे तर मदत देणारी हवी यासाठी परकीय आर्थिक मदत न स्वीकारण्याचे धोरण मान्य केले गेले. याचा अर्थ हिंदुस्थानात आपत्तीवेळी कुठलीच मदत स्वीकारली नाही असे नाही, नुकतंच केरळमध्ये युएई कडून मोठ्या प्रमाणात मदत सामुग्री पाठवली होती ती हिंदुस्थानने स्वीकारून त्याचे योग्य वितरणही केले होते.

यासंदर्भात इंग्रजी वृत्तपत्र द टेलिग्राफ, मिंट, इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस यांनी विविध माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यावरूनच हिंदुस्थानचे धोरण समोर आले आहे.

विदेशी मदत स्वीकारण्याचे धोरण

 • १९९९ साली तत्कालीन अर्थमंत्री खुशवंत सिंग यांनी विकसित देश जे हिंदुस्थानला मदत करतात त्यांच्या नावात कपात केली.
 • राष्ट्रीय आपत्ती निवारण योजनेनुसार जर एक परकीय देश हिंदुस्थानला सद्भावानने मदत देण्यास तयार असेल तर दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री त्यावर चर्चा करून हिंदुस्थान ती मदत स्वीकारू शकतो.
 • संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आपत्तीसमयी बचाव कार्ये राबवू शकतात.
 • युरोपीय संघाने हिंदुस्थानी रेड क्रॉस या संस्थेच्या माध्यमातून एक लाख ९२ हजार युरोंची मदत केल्याचे २३ ऑगस्ट रोजी जाहीर केले होते.

परकीय मदत नाकरण्याचे कारण

 • हिंदुस्थान हा जगात मदत घेणारा ऐवजी मदत देणारा अशी प्रतिमा बनवू पाहत आहे.
 • यासाठी हिंदुस्थानने परकीय मदत घेणे आणि त्यावर अवलंबून असण्याचे धोरण संपुष्टात आणण्याचे ठरवले आहे.
 • २००४ साली त्सुनामी नंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हिंदुस्थानच्या कपाळावरील गरीब देश हा शिक्का पुसण्यासाठी हे पाऊल उचलले.
 • हिंदुस्थाने आतापर्यंत अफगाणिस्तान, श्रीलंका, भुतान सारख्या देशांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे
 • ही मदत फक्त आर्थिक नाही तर वेगवेगळ्या प्रकारची आहे.
 • हिंदुस्थानने अफगाणिस्तातला त्यांची संसद आणि सलमा धरण बांधण्यास मदत केली होती.

परकीय मदत केव्हा स्वीकारली होती

 • त्यापूर्वी १९९१ साली उत्तर काशीत आलेला पूर
 • १९९३ साली लातुरमध्ये झालेला भूकंप
 • २००१ साली गुजरातमध्ये झालेला भूकंप
 • २००२ साली पश्चिम बंगालमध्ये आलेले वादळ
 • २००४ साली बिहारमध्ये आलेला पूर या आपत्तींवेळी हिंदुस्थानाने परकीय मदत स्वीकारली होती.

केव्हा मदत स्वीकारली नाही.

 • २००४ पासून हिंदुस्थाने परकीय मदत स्विकारलेली नाही.
 • २००५ साली जम्मू कश्मीरमध्ये भूकंपावेळी तेव्हा हिंदुस्थानने परकीय मदत स्वीकारली नाही.
 • २०१३ साली उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीत हिंदुस्थानने मदत नाकारली होती
 • २०१४ साली ओडिशामध्ये आलेल्या सायक्लोन वादळात आर्थिक मदत नाकारली होती.

हिंदुस्थानने परकीय केली राष्ट्रांना मदत

 • २००५ साली कश्मीरमध्ये भूकंप झाला होता, त्यात पाकव्याप्त कश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणत जीवित आणि वित्त हानी झाली होती, हिंदुस्थानने पाकिस्तानला मदत केली होती
 • २००५ साली अमेरिकेत कतरिना वादळाने थैमान घातले होते तेव्हा हिंदुस्थानने मोठ्य प्रमाणात मदत सामग्री पाठवली होती
 • २००४ साली त्सुनामीचा फटका हिंदुस्थानला बसलेला असताना श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया देशांना मदत केली होती
 • २००७ साली बांगलादेशात सायक्लोन वादळामुळे हानी झाली तेव्हा हिंदुस्थान मदतीसाठी सरसावला होता
 • २०११ साली जपनामध्ये त्सुनामी आल्यावर हिंदुस्थानने जपानला मदत केली होती.
 • २००८ साली चीनमध्ये भूकंप झाला तेव्हा हिंदुस्थानने आपल्यापरीने मदत केली होती.
 • २०१५ साली नेपाळमध्ये भूकंप झाला तेव्हा सर्वाधिक मदत करणार्‍यांमध्ये हिंदुस्थान अग्रेसर होता.