वयाच्या 48 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने केला साखरपुडा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री पूजा बेदी हीने वयाच्या 48 व्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड मानेक कॉन्ट्रॅक्टर याच्यासोबत साखरपुडा केला आहे. या वर्षअखेरीस ते दोघे लग्न करणार आहेत. पूजाचे हे दुसरे लग्न आहे.


View this post on Instagram

Actress #poojabedi got engaged to her boyfriend #maneckcontractor this valentine’s day ❤️

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मानेक आणि पूजा गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या वर्षी 14 फेब्रुवारीला त्यांनी साखरपुडा केला. ‘मानेक हा चांगला व्यक्ती आहे. माझ्या मुलांचे देखील त्याच्याशी खूप चांगले पटते. त्यामुळे आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आहे’, असे पूजाने सांगतिले.

पूजाची मुलगी आलिया फर्निचरवाला ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे आलियाच्या शूटींगचे शेड्युल आल्यानंतरच पूजाच्या लग्नाची तारिख निश्चित होणार आहे. पूजाचे याआधी तिचे 1990 मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न झाले होते. मात्र 2003 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.