बहुरंगी फॅशन

>>पूजा पोवार, फॅशन डिझायनर<<

आपण स्त्रियांना सजण्यासाठी फार मोठं विशेष कारण लागत नाहीमग नाताळ हा तर मौजमजा करण्याचा सण. पाहूया विविधरंगी फॅशन

नाताळ आनंदाचा जल्लोष… भेटवस्तूंची देवाणघेवाण… छोटय़ा घंटा, काठय़ा, लहान मुलांचे मोजे, भेटवस्तू, विजेचे दिवे लावून झाडांची सजावट… सहभोजनाचा आस्वाद… याबरोबरच ख्रिसमसनिमित्त केलेले पोषाख हेही या सणाचे एक अनोखे वैशिष्टय़ आहे. आज  नाताळ सणानिमित्त लहानमोठय़ा सर्वांसाठीच छान छान आधुनिक पोषाख बाजारात उपलब्ध आहेत.

या काळात झगमगीत, चमकदार फ्रॉक्स, स्कर्ट, कुर्तेही वापरू शकता. मात्र यामध्ये आपल्याकडे असलेले फॅशनेबल दागिने आणि विविधरंगी बूट परिधान केल्यामुळे आपला पोषाख जास्तीत जास्त आकर्षक होऊ शकतो. वर्षभरात झगमगीत कपडे घालणं टाळलं जातं, पण ख्रिसमस या आनंददायी सणानिमित्त ग्लॅमरस लूक देणारे कपडे वापरता येतात.

घरातील उपलब्ध कपडय़ांची फॅशन

> ज्यांना नवीन कपडे खरेदी करता येणे शक्य नाही ते घरातीलच उपलब्ध ‘कपडे नव्या पद्धतीने वापरू शकतात. आपल्याकडी पलाझोवर वापरण्यासाठी क्रॉप टॉप आणि लांब जॅकेट घालू शकता. कानात मोठे कानातले घालते की लूक बदलतो.

> सगळ्यांकडे प्लेन ड्रेसेस असतात. तेही स्कार्फवर घालू शकतो. त्यावर प्लेन बूट उठून दिसतात. कानात छानसे कानातलेही आपल्याला आकर्षक बनवतील.

> आपल्याकडे प्लेन बूट असतात. त्यावरही प्लेन ड्रेसवर ज्वेलरी किंवा स्कार्फ न घेताही वापरता येतात.

> लाल टॉप किंवा पांढरा टॉप- पॅण्ट हे बहुतांश लोकांकडे असतातच.  लाल आणि पांढऱया रंगाच्या कपडय़ांची रंगसंगती केलेले कपडे ख्रिसमस लूक देतात. त्यावर सोनेरी रंगाचे दागिने उठून दिसतात.

ख्रिसमस फॅशन

सध्या फॅशनमध्ये क्रॉप टॉप्स, गुडघ्यापर्यंत स्कर्ट किंवा थ्री फोर्थ असे वेगवेगळ्या प्रकारचे स्कार्फ प्रत्येक ड्रेसवर छानशा रंगसंगतीनुसार वापरू शकतो. विंटर कॅपही वापरता येतात. शॉर्ट ड्रेस किंवा स्कर्ट ज्यांना घालायची इच्छा आहे त्यांनी लाँग शूज घातले तर विंटर लूक दिसतो. ते स्टॉकिंगही वापरू शकता. त्यामुळे फॅशनेबल आणि आकर्षकही दिसाल. ज्यांना सणादरम्यान बाहेर जायचं नाही ते घरीच शिफॉन किंवा लेनिन वापरू शकतात. त्यावर शिमरी शूज उठून दिसतात. हिवाळा असल्यामुळे शक्यतो डोळ्यांना मेकअप करू शकता. त्यावर मोकळे केस आणि डार्क लिपस्टिक तुम्हाला आधुनिक लूक देते.

आकर्षक दिसण्यासाठी आधुनिक पोषाख

> प्लेन डेनिमवर झगमगीत टॉप घालू शकता. काळ्या रंगाच्या झगमगीत स्कर्टवर कोणत्याही रंगाचा टॉप घालायची. त्यावर गळ्यात फॅशनेबल ज्वेलरी शोभून दिसते. या पोषाखाला ग्लॅमरस लूक देण्यासाठी चेन असलेले लांब जंप शूजही छान दिसतात.

> वारली नक्षीकाम असलेले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेल्या गुडघ्यापर्यंत स्कर्टवर त्यावर प्लेन टॉप घालायचा. त्याला शोभेल अशी गळ्यात, कानात ज्वेलरी घालायची. प्रिंटेड स्कर्टवर पांढऱया रंगाचा टॉप उठून दिसतो.

> या सणादरम्यान थंडी असल्याने वेलवेट ड्रेसेसची निवड करू शकता. ज्यांना चमकदार  कपडे आवडत नाहीत तेही या कापडाचे कपडे वापरू शकतात. आधुनिक फॅशननुसार गुडघ्यापर्यंत किंवा घोळदार स्कर्ट वापरावेत. वेलवेटच्या ड्रेसवर प्लेन रंगीत वेलवेटचे उंच टाचांचे बूट घालावेत.

> सध्या गुडघ्यापर्यंत किंवा लांब स्लिटचे स्कर्ट वापरण्याचा ट्रेंड आहे. अशा प्रकारची खरेदी या काळात करू शकता.