उत्तर-मध्य मुंबईत महायुतीच, पूनम महाजन यांना दणदणीत विजय

95

सामना ऑनलाईन । मुंबई

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीने दणदणीत विजय मिळवला. भाजप कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसैनिकांनी केलेल्या कामामुळेच महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांना तब्बल चार लाख 82 हजार 475 मते मिळाली. पूनम महाजन यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत राखली.

सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असलेल्या उत्तर-मध्य मुंबईत 16 लाख 50 हजार मतदारांपैकी सुमारे आठ लाख 95 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पूनम महाजन यांनी 53 टक्के मते घेत दणदणीत विजय मिळवला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना 39 टक्के म्हणजेच 3 लाख 54 हजार 567 मतांवर समाधान मानावे लागले. 17 उमेदवारांना एक हजार मतांचा टप्पा ओलंडता आला नाही. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या