लोकसभेतील 10 सर्वात गरीब खासदार, कोणाकडे घर नाही, तर कोणाकडे…

330

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभेची 17 वी निवडणूक संपन्न झाली आहे आणि देशभरातून 542 खासदार निवडून आले आहेत. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि लवकरच मंत्रिमंडळाची घोषणा होईल. दरम्यान, नवनिर्वाचित खासदारांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची आकडेवारी समोर आली आहे. यातील काहींकडे राहायला स्वत:चे घरही तर काही भल्या मोठ्या बंगल्यांचे मालक आहेत. लोकसभेत निवडून गेलेले 542 खासदारांपैकी 6 खासदार असे आहेत ज्यांच्याकडेअचल संपत्ती नाही. यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि सर्वात तरुण खासदार चंद्राणी मुर्मू यांचाही समावेश आहे. चला तर पाहूया सर्वात कमी ते सर्वात जास्त संपत्ती असणार खासदार…

सर्वात कमी संपत्ती असणारे 10 खासदार –

गोड्डेटी मधावी –
आंध्र प्रदेशमधील अरकू मतदारसंघात वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार गोड्डेटी मधावी यांच्याकडे 1.41 लाख रुपयांची रोख रक्कम आहे, परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अचल संपत्ती नाही.

चंद्राणी मुर्मू –
बीजेडीच्या तिकिटाव ओडिशाच्या क्योंझर मतदारसंघातून निवडून आलेल्या देशातील सर्वात तरुण खासदार 25 वर्षीय चंद्राणी मुर्मू यांच्याकडे 3.40 लाखांची रोख रक्कम आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची अचल संपत्ती नाही.

महंत बालक नाथ –
राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार महंत बालक नाथ यांच्याकडे 3.52 लाखांची रोख रक्कम आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर –
भोपाळमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे 4.44 लाखांची रोख रक्कम आहे. त्यांच्याकडेही कोणत्याही प्रकारची अचल संपत्ती नाही.

इंद्र हांग सुब्बा –
सिक्कीममधून एसकेएम या पक्षाकडून खासदारपदावर निवडून आलेले इंद्र हांग सुब्बा यांच्याकडे 4.78 लाखांची रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे कोणतीही अचल संपत्ती नाही.

मो. फैजल पीपी –
लक्षद्वीपमधून लोकसभेवर निवडून गेलेले एनसीपी पक्षाचे खासदार मो. फैजल पीपी यांच्याकडे 9.38 लाखांची रोख रक्कम आहे. वरील पाच खासदारांप्रमाणे अचल संपत्ती नसणारे फैसल सहावे खासदार आहेत.

प्रतिमा भौमिक –
त्रिपुरातून पश्चिम त्रिपुरा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार प्रतिमा भौमिक यांच्याकडे 2.50 लाख रोख आहेत, तर 3.92 लाखांची अचल संपत्ती आहे.

प्रमिला बिसोई –
ओडिषाच्या अस्का मतदारसंघातून बीजेडीकडून निवडून आलेल्या खासदार प्रमिला बिसोई यांच्याकडे 3.73 लाखांची रोख रक्कम आहे, तर 3.60 लाखांची अचल संपत्ती आहे.

सेरिंग नामग्याल –
जम्मू-कश्मीरच्या लडाख मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार सेरिंग नामग्याल यांच्याकडे 6.48 लाखांची रोख रक्कम आहे आणि 3.33 लाखांची अचल संपत्ती आहे.

राम्या हरिदास –
केरळच्या अथापूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे खासदार राम्या हरिदास यांच्याकडे 1.52 लाखांची रोख रक्कम आणि 10 लाखांची अचल संपत्ती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या