अॅनेमियाच्या दुर्धर आजाराने ग्रस्त पूर्वा सावंतला आर्थिक मदतीची गरज

सामना प्रतिनिधी, कणकवली

सिंधुदुर्ग कणकवली येथील रहवाशी प्रमोद प्रल्हाद सावंत यांच्या पूर्वा सावंत या सात वर्षांच्या चिमुरडीला ‘अप्लास्टीक ऍनेमिया’ या दुर्धर आजाराने ग्रासले असून तिच्यावर तातडीने ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे तिच्यावरील उपचारासाठी दानशुरांनी पुढे येऊन सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

माहीमच्या एस.एल. रहेजा (फोर्टीज) रुग्णालयात पूर्वा सावंत हिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. अक्षय कर्पे यांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरू असल्याने चिमुकलीला वाचविण्यासाठी वडील प्रमोद सावंत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. वर्षाला जेमतेम ४५ हजारांचे उत्पन्न असलेल्या सावंत यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यात डॉक्टरांनी मुलीवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सावंत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैशांची जमवाजमव सहा महिन्यांत कशी उभारायची या चिंतेने ग्रासले आहे. मात्र हिंमत न हारता मुलीच्या आयुष्याला उभारी देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठी आपले मित्र, आप्तेष्ट, एनजीओ, धार्मिक ट्रस्ट, संस्था आणि संघटना यांच्याकडे त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी आर्थिक मदतीसाठी प्रमोद सावंत मो. क्र.९४२३८०६१०२, आनंद सावंत, मो. क्र. ९८३३७३४८१९, सुयोग सावंत मो. क्र. ८८७९७५५७७२, अखिल सावंत मो. क्र. ९८७०५३८८८९ येथे अथवा [email protected] यावर मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.