आता तोच खाते क्रमांक ठेवून बँकबदलता येणार

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आता मोबाईल क्रमांकाप्रमाणे बँकेचा खाते क्रमांक तोच ठेवून बँक बदलता येणार आहे. आरबीआय या योजनेवर काम करत असून लवकरच ही सेवा प्रदान करण्यात येईल, असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की, येणाऱया काळात एखाद्या बँकेला वैतागलेला ग्राहक त्याच्या बँकेचा खाते क्रमांक न बदलता थेट बँकच बदलू शकेल. सध्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बँकेचे व्यवहार होत आहेत. अकाऊंट नंबर पोर्टेबिलिटीची योजनाही त्याचाच एक भाग असल्याचे मुंद्रा यांनी स्पष्ट केले.

  • anil shivaji gaikwad

    sukanya yojana sahti post office madhun account transfer karayala pahije. city post must be do online. Employee of post office is very poor quality for all activities.