मुंबईत निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला, तीन जण अडकल्याची भिती


सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील नागापाडा भागातील एक निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला आहे. नागापाडाच्या पीर खान भागातील ही इमारत असून कोसळलेल्या भागाच्या ढिगार्‍याखाली दोन ते तीन  जण अडकल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.