प्रसाद ओकच्या कच्चा लिंबूचं पोस्टर प्रदर्शित

1

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित आगामी कच्चा लिंबू या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाची निर्मिती मंदार देवस्थळी यांनी केली असून कथा-पटकथा चिन्मय मांडलेकर यांची असणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेता सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम दिसत आहेत. चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे.

विशेष म्हणजे दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. पोस्टरवर त्यांचाही फोटो झळकत असून नेहमीपेक्षा वेगळ्या रुपात रवी जाधव दिसत आहेत. या पोस्टरमुळे चित्रपटात नेमकं काय असणार आहे, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत, टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.