मोदी सरकारचा आणखी एक झटका,पीपीएफ आणि अल्प मुदतीच्या बचतींवरील व्याजदर घटवले

4

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

नोटाबंदीचा निर्णय घेऊन सामान्य जनतेला छळल्यानंतर मोदी सरकारने त्याच्यावर आणखी एक बॉम्ब टाकलाय. केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी आणि अल्प मुदतीच्या बचतींवरील व्याज दर कमी केलाय. ज्यामुळे सामान्य माणसाला व्याजातून मिळणारा फायदा आता कमी होणार आहे. व्याज दरात ०.१ टक्क्यांनी कपात करण्याचा हा निर्णय आहे.

या निर्णयानंतर आता भविष्य निर्वाह निधीवर वर्षाला ७.९ टक्के व्याज मिळेल. पूर्वी हा व्याज दर ८ टक्के इतका होता. राष्ट्रीय बचत योजनेसाठीही पूर्वी ८ टक्के वर्षाला व्याज दर होता जो आता ७.९ टक्के इतका करण्यात आला आहे. अनेक मध्यमवर्गीयांसाठी बचतीचा उत्तम मार्ग असलेल्या किसान विकास पत्रासाठीचा व्याज दर देखील करण्यात आलाय. ११२ महिन्यांसाठी किसान विकास पत्रावर ७.६ टक्के व्याजदर मिळेल. लहान मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धि योजनात गुंतवणूक करणाऱ्यांना आता ८.५ टक्क्यांऐवजी आता फक्त ८.५ टक्के व्याजदर मिळेल. वरीष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेसाठीही हाच व्याजदर असेल. बदललेले व्याज दर एक एप्रिलपासून लागू होणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या